बातम्या
सावकर चषक 2025 क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
By nisha patil - 1/21/2025 5:49:19 PM
Share This News:
सावकर चषक 2025 क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील मानेवाडी माळ मैदानावर 'सावकार चषक 2025' क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. 13, 14 आणि 20 जानेवारी रोजी झालेल्या या स्पर्धेत 14 संघांनी सहभाग घेतला.
श्री बाळूमामा स्पोर्ट्स चव्हाणवाडी संघाने विजेतेपद पटकावले, तर जय हनुमान स्पोर्ट्स उत्तरे संघाने द्वितीय आणि वाशी शिक्षण संस्था संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
बक्षीस वितरण समारंभ आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाला. प्रथम पारितोषिक रु. 10,001 व चषक अशोक माने सर यांनी दिले, तर अन्य पारितोषिके संजय माने आणि संजय सुतार यांनी प्रदान केली. स्पर्धेचे यशस्वी आयोजन अजित गायकवाड आणि त्यांच्या टीमने केले.
सावकर चषक 2025 क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
|