बातम्या
सयाजी शिंदेंचं रंगभूमीवर २२ वर्षांनंतर पुनरागमन होणार
By nisha patil - 1/23/2025 5:59:51 PM
Share This News:
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंनी हिंदी, मराठी आणि साऊथ सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सयाजी शिंदे तब्बल २२ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करीत आहेत.
सयाजी शिंदेंनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेला अभिनेता, चित्रपटनिर्माता आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेतच. तर सयाजी शिंदे तब्बल २२ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करीत आहेत. सुमुख चित्र आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या सहकार्याने साकारली जाणारी नवी नाट्यकृती त्यांचं हे पुनरागमन खास बनवणार आहे.
सयाजी शिंदे या नाटकात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सयाजी शिंदे यांची रंगभूमीवरील कारकीर्द ठळक आहे. मराठी रंगभूमीवर सज्ज होत असलेल्या या दमदार कलाकृतीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
सयाजी शिंदेंचं रंगभूमीवर २२ वर्षांनंतर पुनरागमन होणार
|