बातम्या
कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून योजनेचे पैसे परत घेणार नाही
By nisha patil - 1/23/2025 2:12:12 PM
Share This News:
कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून योजनेचे पैसे परत घेणार नाही
आदिती तटकरेंनी लाभार्थी महिलांना दिला दिलासा
राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून या योजनेचे पैसे परत घेणार नाही. तसेच, पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. असा दिलासा आदिती तटकरेंनी दिलाय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थीकडून पैसे परत घेण्याबाबतचा निर्णय सरकारने घेतलेला नाही, असा दिलासा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिलाय. त्या म्हणाल्या, राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून या योजनेचे पैसे परत घेतलेले नाही. तसेच, पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. काही महिलांनी नोकरी, नवीन गाडीची खरेदी, परराज्यात स्थलांतर या कारणांनी योजनेसाठी अपात्र ठरत असल्याने पैसे माघारी करण्यासाठी स्वतःहून शासनाला अर्ज केलेले आहेत. रोज पाच-सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येतात असे त्या म्हणाल्या.
कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून योजनेचे पैसे परत घेणार नाही
|