बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये स्कूल कनेक्ट संपर्क अभियान संपन्न
By nisha patil - 12/2/2024 6:06:39 PM
Share This News:
कोल्हापूर दि.12: येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर मधील NEP Implementation Cell आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचा आय.क्यू.ए.सी.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन मध्ये स्कूल कनेक्ट (NEP Connect) संपर्क अभियान संपन्न झाले. या संपर्क अभियानासाठी कोल्हापूर शहरातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.
यावेळी पहिल्या सत्रात विवेकानंद कॉलेजमधील नोडल ऑफिसर डॉ. सी. बी. पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उद्दिष्ठये व वैशिष्टये या विषयी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भावनिक बुध्दीमत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सात्मक विचार रुजविणे, समाजाचा सांस्कृतिक विकास घडवून आणणे महत्वाचे आहे. या धोरणामध्ये विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदव्या घेता येत असून विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास वाढविता येणे शक्य आहे. असे मत मांडले.
तर दुसऱ्या सत्रात विवेकानंद कॉलेजचे नॅक समन्वयक डॉ. एस. आर. कट्टीमनी यांनी शिवाजी विद्यापीठ आणि विवेकानंद कॉलेज येथील भौतिक व शैक्षणिक सुविधा या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. विवेकानंद कॉलेजने 2023-24 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला असून कौशल्याधारित अनेक अभ्यासक्रम या कॉलेजने राबविले आहेत. या अभ्यासक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एस. एस. अंकुशराव यांनी केले. आभार डॉ.डी.आर.तुपे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.समीक्षा फराकटे व प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये स्कूल कनेक्ट संपर्क अभियान संपन्न
|