शैक्षणिक
विवेकानंद मध्ये मायक्रोबायोलॉजी विभागात ‘विज्ञान सप्ताह’ साजरा
By nisha patil - 6/3/2025 2:19:42 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये मायक्रोबायोलॉजी विभागात ‘विज्ञान सप्ताह’ साजरा
कोल्हापूर दि. 06 : विवेकानंद महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभाग व IQAC विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दि. 24.2.2025 ते 03.03.2025 दरम्यान विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या सप्ताह दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाची सुरुवात दिनांक 24.02.2025 रोजी इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख डॉ. सी. बी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली. उद्घाटना वेळी झूलॉजी विभाग प्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर सप्ताहात पोस्टर, मॉडेल, मायक्रोटून, स्लोगन, एक्स्टेंपर, आगार आर्ट व फर्मेंटेड फूड अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. विजेत्या विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सप्ताहाची सांगता बॉटनी विभाग प्रमुख डॉ. बी. टी. दांगट यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभाने झाली. सर्व स्पर्धांचे नियोजन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, विभाग प्रमुख डॉ. टी. सी. गौपाले, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या नियोजन केले.
विवेकानंद मध्ये मायक्रोबायोलॉजी विभागात ‘विज्ञान सप्ताह’ साजरा
|