बातम्या
व्यापक बदलासाठी विज्ञानाची कास पकडणे गरजेचे. डॉ. राजेंद्र कुंभार, माजी प्राचार्य, जयसिंगपूर कॉलेज
By nisha patil - 1/4/2024 11:54:19 AM
Share This News:
येथील विवेकानंद महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत दत्ताबाळ स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत " विज्ञान व तत्वज्ञान " या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी वक्ते म्हणून जयसिंगपूर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार हे उपस्थित होते.
यावेळी आपले विचार व्यक्त करत असताना डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले की, शास्त्रज्ञ माणसांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर शोधन्याचे काम करतात. धर्मावर टिका केली की तुम्ही धर्मद्रोही ठरता. विज्ञानात मागच्या संशोधकावर टिका केली की तुम्ही शास्त्रज्ञ ठरता. विज्ञानाची कल्पना करतो तो खरा शास्त्रज्ञ. ‘आम्ही’चे प्रश्न तत्वज्ञान सोडवू शकत नाही, ते ‘मी’चे प्रश्न सोडवते. संत तुकोबाराय यांनी सार्वकालिक लोककल्याणाचे तत्वज्ञान मांडले.वास्तव जीवनात व्यापक बदल घड़वायचा असेल तर आपण विज्ञानाची कास पकडायला हवी.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर आर कुंभार उपस्थित होते. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आपण आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे.विज्ञान माणसाला विचार करायला प्रवृत्त करते. यातून माणूस विवेकशील बनतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. दत्ता जाधव यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कैलास पाटील यांनी मानले . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रबंध्क श्री आर.बी.जोग, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते
व्यापक बदलासाठी विज्ञानाची कास पकडणे गरजेचे. डॉ. राजेंद्र कुंभार, माजी प्राचार्य, जयसिंगपूर कॉलेज
|