बातम्या

महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन ...

Sculptor of Maharashtra Greetings to Yashwantraoji Chavan through Gokul


By nisha patil - 12/3/2024 7:27:00 PM
Share This News:



कोल्‍हापूर : ता. १२ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांच्‍या १११ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्‍या उपस्थितीत स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांच्‍या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला जातो ते म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इ. निगडीत होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. ते भारताचे पाचवे उपपंतप्रधान देखील होते. यशवंतराव चव्हाण यांनीही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सहकारी संस्था स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.        

  यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्यसैनिक, सहकारी नेते आणि समाजसेवक होते. सामान्य माणसाचा नेता म्हणून ते लोकांमध्ये लोकप्रिय होते. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१४ रोजी, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला. यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि वैचारिक वारसा आणि राज्याच्या विकासातील योगदान आजही महाराष्ट्राच्या स्मरणात आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात एक कार्यक्षम,सर्वसामान्य कुटुंबातुन पुढे आलेला कर्तबगार व दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांची देशभर ख्याती झाली. तसेच स्‍व. चव्‍हाण साहेबाचे राजकीय,सामाजीक व इतर क्षेत्रातील कार्य आम्‍हास प्रेरणादायी आहे असे मनोगत व्‍यक्‍त केले.

          यावेळी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, संचालक रणजितसिंह पाटील, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, व्यवस्थापक (वित्त) एच.एम.कापडिया, सहा.व्यवस्थापक (संगणक) व्ही.व्ही.जोशी, व्यवस्थापक (सिव्हील) पी.एम.आडनाईक, व्यवस्थापक (खरेदी) के.एन.मोळक, मार्केटिंग विभाग प्रमुख हणमंत पाटील, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, प्रशासन अधिकारी बाजीराव राणे,लक्ष्मण धनवडे, संग्राम मगदूम व संघाचे अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.


महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन ...