बातम्या

जम्मू-काश्मीरच्या कोकरनाग येथे सर्च ऑपरेशन सुरु

Search operation started in Kokarnag of Jammu and Kashmir


By nisha patil - 9/18/2023 4:23:47 PM
Share This News:



भारतीय सैन्य दलाकडून गेल्या सहा दिवसांपासून ‘ऑपरेशन गॅरोल’ सुरु आहे. दहशतवादी गॅरोल या गावात लपून बसले होते. त्यामुळे या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन गॅरोल असं ठेवण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्य दहशतवाद्यांना पळवून-पळवून यमसदनी पाठवत आहेत. यासाठी भारतीय सैन्य ड्रोन आणि रॉकेट लॉन्चरच्या मदतीने बॉम्बचे हल्ले करत आहे. तसेच भारतीय सैन्याने आज सकाळी पुन्हा दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर सुरक्षा दलांना एक जळालेलं शरीर मिळालं आहे. मृतदेहावरील कपडे पाहिल्यानंतर ते मृतदेह दहशतवाद्याचंच असल्याचा भारतीय सैन्याचा दावा आहे. अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी आजसुद्धा ड्रोनची मदत घेण्यात आली. भारतीय सैन्याकडून अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.ज्या परिसरात शोध मोहीम सुरु आहे, तो परिसर भारतीय सैन्यासाठी खूप आव्हानाचा आहे.तसेच मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याचा जिथे गोळाबार सुरु आहे तो परिसर पीर पंजाल डोंगरी भागात येतो. हा भाग मुजफ्फराबाद येथून किश्तवाडपर्यंत पसरलेला आहे. जवळपास 170 किमीचा हा परिसर आहे. विशेष म्हणजे या परिसरात अनेक गुहे आहेत. याच गुहांमध्ये अतिरेकी लपून बसलेली असतात. आणि या गुहांमधून दहशतवादी सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करुन घातपाताचा डाव घडवून आणला जाऊ शकतो. त्यामुळे ही लढाई सोपी नाहीय. सैन्याकडून ड्रोनच्या साहाय्याने मदत घेतली जात आहे. हे सर्च ऑपरेशन आणखी किती वेळ चालेल याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.


जम्मू-काश्मीरच्या कोकरनाग येथे सर्च ऑपरेशन सुरु