बातम्या

10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

Section 144 applicable in 10th 12th examination center area


By nisha patil - 2/16/2024 1:38:44 PM
Share This News:



जिल्ह्यात उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) 73 परीक्षा केंद्रे व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) 137 परीक्षा केंद्रे आहेत. जिल्हयात ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार आहेत अशा परीक्षा केंद्रांच्या, उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात दि. 21 फेब्रुवारी ते 26 मार्च 2024 या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षा पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायं. 6 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास, वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन, व लॅपटॉप यांच्या वापरावर अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी बंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. वरील बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना, त्यांना नेमून दिलेल्या परिक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू राहणार नाही.


10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू