बातम्या
परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
By nisha patil - 12/7/2024 8:46:32 PM
Share This News:
जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा दि. १६ जुलै ते दि. ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत तसेच माध्यमिक शालांत (इयत्ता १० वी) ची परीक्षा दि. १६ जुलै ते दि.३० जुलै २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा शांततेत, सुव्यवस्थेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आणि या परीक्षा केंद्रावरील, उपकेंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केला असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची १० परीक्षा केंद्रे व माध्यमिक शालांत (इयत्ता १० वी) ची १४ परीक्षा केंद्रे असून या परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात, परिसरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास वेळीच बंदी घालणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार आहेत अशा परीक्षा केंद्रांच्या, उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात दि. १६ जुलै ते ८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षा पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी ७ पासून ते सायंकाळी. 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास, वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन, व लॅपटॉप यांचा वापर करण्यास याव्दारे बंदी घालण्यात येत आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना, त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
|