बातम्या

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे उत्तम सामाजिक संस्काराचे बीजारोपण – उत्तम आंबवडे

Seeding of good social culture through National Service Scheme


By nisha patil - 4/15/2024 6:03:32 PM
Share This News:



कोल्हापूर:  राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांच्या आयुष्यात सेवा व त्यागाचे महत्व अधोरेखित होईल. विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा अधिक समृद्ध होतील व उत्तम सामाजिक संस्कारामुळे युवाशक्तीचा उपयोग समाज व राष्ट्राच्या बळकटीसाठी होईल असा विश्वास उजळाईवाडीचे लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे यांनी व्यक्त केला.

  डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचे सात दिवसीय श्रम संस्कार शिबीर उजळाईवाडी (ता. करवीर) येथे संपत्र झाले.  या शिबिराचे उद्घाटन आंबवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य रुधीर बारदेसकर, उपसरपंच सौ प्रतिभा पोवार, मुख्याध्यापिका राजश्री मगदूम यांच्या उपस्थित या शिबिराचे उद्घाटन झाले.

    कुलगुरू डॉ. मुदगल म्हणाले, राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वाचे आहे. स्वयंसेवकांनी ग्रामीण भागातील माणसाचे जीवन समजून घेतले पाहिजे. खेडोपाड्यात राहणाऱ्या गोरगरीब माणसासाठी आपण काम केले पाहिजे. या शिबिरांमधून विद्यार्थ्यांमध्ये अशी भावना निर्माण होऊन देशासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल.

 या सात दिवसीय शिबिरात गावामध्ये स्वछता अभियान, लहान मुलांची आरोग्य तपासणी, शाळेतील विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, प्रथमोपचार, पोषण आहार याबाबत मार्गदर्शन, डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान  शिबीर आदी उपक्रम राबविण्यात आले.  मतदान केद्रस्तरिय  अधिकारी  रोहिणी शिंदे व अतुल सुतार यांनी मतदार जनजागृती मार्गदर्शन केले. त्याचबरोबर महिलांसाठी पाककला प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा, बेकरी पदार्थांची प्रात्यक्षिके, करियर व संधीबाबत प्रा. प्रसन्न करमरकर यांचे व्याख्यान, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, डॉ युवराज मोटे यांचे  भौगालिक पर्यावरणाचे बदलते स्वरूप या विषयी व्याख्यान, डॉ मेघा पानसरे यांचे अंधश्रद्धा निर्मुलनपर व्याख्यान, डॉ राम पोवार यांचे व्यायाम योगाभ्यास वआत्मसंरक्षण याबाबत मार्गदर्शन आणि के के भाउजी प्रस्तुत ‘होम मिनिस्टर’ हा मनोरंजक कार्यक्रम संपन्न झाले.

 शिबिराच्या अखेरच्या दिवशी ग्रामस्थांसाठी फ़िजिओथेरपि शिबीर ठेवण्यात आले. डी वाय पाटील स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सचे समन्वयक डॉ. आर एस पाटील, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. अद्वैत राठोड यांच्या प्रामुख उपस्थित शिबिराची सांगता झाली. 

प्राचार्य रुधीर  बारदेस्कर, राहुल दाते,  प्रा. रुबेन काळे, सुरज यादव, रोहन हवालदार , रोहन वाडकर, स्वप्नील सरदेसाई, आतिश लादे यांनी शिबिर यशस्वीततेसाठी मेहनत घेतली. या उपक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव व्ही व्ही भोसले, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ अद्वैत राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

उजळाईवाडी- श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना उत्तम आंबवडे. समवेत डॉ. राकेश कुमार मुदगल, डॉ. व्ही. व्ही. भोसले, रुधीर बार्देसकर, प्रतिभा पोवार, राजश्री मगदूम आदी.


राष्ट्रीय सेवा योजनेमुळे उत्तम सामाजिक संस्काराचे बीजारोपण – उत्तम आंबवडे