बातम्या

विवेकानंद कॉलेजच्या 161 विद्यार्थ्यांची EPIC Consulting Services Pune या कंपनीमध्ये निवड

Selection of 161 students of Vivekananda College in EPIC Consulting Services Pune


By nisha patil - 10/19/2024 9:59:30 PM
Share This News:



 विवेकानंद महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त) कोल्हापूरच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल विभागाकडून दिनांक 14.08.2024 रोजी जी.टी.टी. फौडेशन, पुणे यांच्या मार्फत एकदिवसीय कार्यशाळेचे

आयोजन करण्यात आले होते.  ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त्‍ विद्यार्थ्यांनी NSDC Portal वर रजिस्ट्रेशन पूर्ण केले. व त्यातील काही विद्यार्थ्यांनी अँप्टीटयूड व सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विद्यार्थ्याचा टेलिफोनिक इंटरव्हयू घेण्यात आला. व त्यातून विश्रांतवाडी पुणे येथील  EPIC Consulting Services या कंपनीमध्ये 161 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 

वरील सर्व विद्यार्थ्याचे  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.

या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर आर कुंभार व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे प्रमुख डॉ. श्रुती जोशी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

या प्लेसमेंट ड्राईव्ह चे यशस्वी नियोजन करण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल चे प्रमुख प्रा. सतीश चव्हाण व सदस्य प्रा. संजय थोरात, डॉ. संजय लठ्ठे, डॉ. राजश्री पाटील, प्रा. विजय पुजारी, डॉ. अस्मिता तपासे, प्रा. पल्लवी देसाई, प्रा. राहुल इंगवले, प्रा व्ही. व्ही. मिसाळ, प्रा ए एल उपाध्ये, डॉ ए आर कासारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विवेकानंद कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. आर.बी.जोग  व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


विवेकानंद कॉलेजच्या 161 विद्यार्थ्यांची EPIC Consulting Services Pune या कंपनीमध्ये निवड