शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांची प्लेसमेंटव्दारे निवड
By nisha patil - 1/27/2025 2:00:21 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांची प्लेसमेंटव्दारे निवड
कोल्हापूर, 27 जानेवारी : विवेकानंद महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलद्वारे 22 जानेवारी 2025 रोजी बजाज कॅपिटल, रिलायन्स निपॉन लाइफ इन्शुरन्स आणि आय.बी.एफ. ॲक्सीस बँक या कंपन्यांमध्ये मुलाखती घेण्यात आल्या.
त्यात कॉमर्स व मॅनेजमेंट शाखेच्या 70 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड झाली. महाविद्यालयाच्या कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे आणि सचिव प्रा. शुभांगी गावडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विवेकानंद कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांची प्लेसमेंटव्दारे निवड
|