विशेष बातम्या
हातकणंगले तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी अनिस मुजावर यांची निवड
By nisha patil - 6/14/2023 9:18:13 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी हातकणंगले येथे माहितीचा अधिकार कायदयासाठी देशव्यापी कार्य करणारे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कार्यकारिणीसाठी काही विशेष निवडी घोषित करण्यात आल्याआहेत. संपूर्ण देशात माहिती अधिकार कायाद्याची जनजागृती व सर्वसामान्य नागरिकांना या कायद्याचे महत्व पटवून देत ,देशाहितासाठी याचा अधिक चांगला वापर व्हावा या उद्धेशाने हा महासंघ कार्यरत आहे. देशभरात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने आजपर्यंत अतिशय उल्लेखनीय कार्य केले असून, यातून सर्वसामान्य नागरिकांना अधिकतम लाभ मिळाला आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे हातकणंगले येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस मुजावर यांची महासंघाच्या हातकणंगले तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी निवड केली. अनिस मुजावर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून सर्वसामान्य नागरिकांचे, युवकांचे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, निराधार महिला व दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतर अनेक संस्था, संघटनामध्ये ते सद्या सक्रियपणे कार्यरत आहेत. शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल त्यांना आजवर अनेक पुरस्कार ही प्राप्त झालेले आहेत.यळगूड येथील सामाजिक कार्यकर्ते शितल कुर्ले यांची माहिती अधिकार महासंघाच्या मुख्य प्रचार संघटक पदी निवड करण्यात आली. शीतल कुर्ले यांनी हातकणंगले तालुक्यात व यळगूड शहरात आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. प्रशासकीय यंत्रनेचा त्यांना गाढा अभ्यास असून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कासाठी शासन दारबारी अनेकदा उपोषण, आंदोलन केले आहेत. तळागाळातील त्यांचे कार्य व तळमळ पाहून त्यांची महासंघाच्या मुख्य प्रचार संघटक पदी निवड केल्याचे पत्र अमर शेणेकर व जयराज कोळी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. सदर निवड पत्र देताना समाधान हेगडकर, स्नेहल करेकर, ऍड.माधुरी म्हेत्रे, वैभव झुंजार, सागर कांबळे, पंकज राजन आदी उपस्थित होते. तारा न्यूज साठी इचलकरंजीहून विनोद शिंदे
हातकणंगले तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी अनिस मुजावर यांची निवड
|