बातम्या

कोल्हापूरच्या खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

Selection of Kolhapur players for National Football Tournament


By nisha patil - 12/22/2023 1:41:59 PM
Share This News:



कोल्हापूरच्या खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड 

कोल्हापूर:  अंदमान निकोबार येथे २८ डिसेंबर २०२३ २ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्यार पाच खेळाडूंची निवड झाली. निवड झालेले पाच ही खेळाडू  महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी आहेत उदगीर लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला. 
   

सौरभ ढाले, रीहान मुजावर, अभयसिंह पाटील, संचित तेलंग व ईशान तिवले, या खेळाडूंची निवड झाली. केली ३० वर्षे महाराष्ट्र स्कूलचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र हायस्कूलचे नाव मोठं करत आहेत.  यंदाची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा अंदमान निकोबार येथे 28 डिसेंबर ते 2 जानेवारी यादरम्यान होणार आहेत. यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष के.जी .पाटील, प्राचार्य. एस. एस .पाटील, संतोष पवार, शरद मेंढे, सूर्यदीप माने, सुर्याजित घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.


कोल्हापूरच्या खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड