बातम्या

विवेकानंद कॉलेजची राज्य्‍स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

Selection of Vivekananda College for State Level Table Tennis Tournament


By nisha patil - 9/21/2024 8:12:20 PM
Share This News:



जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी डेरवण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या विभागीय स्तर टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये विवेकानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला व महाविद्यालयाच्या संघाची परभणी येथे  23 ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सदर स्पर्धेत कोल्हापूर मनपा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सांगली मनपा, इचलकरंजी मनपा, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश होता.

 

संघामध्ये पुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

1. केतन विनायक सुतार - ११ वी सायन्स           2. वेदांत राजेंद्र पाटील - ११ वी सायन्स्‍

3. वैभव रघुनाथ जोग-      ११ कॉमर्स         4. शिवम राजू गुप्ता - ११ सायन्स्‍

5. सोहम शिवकुमार चव्हाण- ११ वी कॉमर्स

 

वरील सर्व खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे , संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे  यांचे प्रोत्साहन लाभले.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.


विवेकानंद कॉलेजची राज्य्‍स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड