बातम्या
विवेकानंदाच्या विक्रम वीरची नौसेनेत सब लेफ्टनंट म्हणून निवड
By nisha patil - 12/25/2023 7:15:00 PM
Share This News:
विवेकानंदाच्या विक्रम वीरची नौसेनेत सब लेफ्टनंट म्हणून निवड
कोल्हापूर :- विवेकानंद महाविद्यालयातील बी.एस्सी. मध्ये शिकणारा शिरोली येथील विक्रम विहीर याची निवड नौसेनेत सब लेफ्टनंट या पदी नियुक्ती झाली आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर महत्वकांक्षी वाटणारी स्वप्नही वास्तवात उतरता येतात. यासाठी कमी वेळेतील अचूकता साधण्याकरिता वेळेचे आणि अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे. असे मत विक्रम वीर यांनी सत्कार प्रसंगी मांडले . अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतून विक्रम वीर याने यशाच गवसणी घातली आहे.सदर विद्यार्थी खूप कमी कालावधीत प्रशिक्षणा दरम्यान मार्कोस सारखे अत्यंत खटकर अतिउच्च दर्जाचे प्रशिक्षण पूर्ण करून,एस एस बी द्वारे अधिकारी पदापर्यंत पोहोचला आहे. असे मत सत्काराप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आ.र कुंभार यांनी मांडले .
सदर विद्यार्थ्यास विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, कौस्तुभ गावडे, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, कॅप्टन सुनीता भोसले, प्रबंधक रघुनाथ जोग, पाच महाराष्ट्र बटालियनचे ऑफिसर कर्नल मानस दीक्षित विद्यार्थ्याचे वडील,आई,भाऊ यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंदाच्या विक्रम वीरची नौसेनेत सब लेफ्टनंट म्हणून निवड
|