बातम्या
शहाजी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 7/19/2023 12:50:53 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील स्त्री व्यक्तिमत्व विकास समिती अंतर्गत सखी मंच व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींच हिंसाचाराविरुद्ध मनोबल उंचावण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांतर्गत दोनशेहून अधिक विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणघेतले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी, त्यास आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वसंरक्षणाचे धडे प्रत्येक विद्यार्थिनींनी गिरवावेत,त्या अनुषंगाने प्रशिक्षित व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी तसेच अतुल साळुंखे व उमेश चौगुले यांनी विद्यार्थिनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच स्वतःचा बचाव कशा पद्धतीने करावा याचे प्रशिक्षण दिले , माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थिनींच्या मनात आत्मविश्वास निर्माण होऊन सुरक्षितेची भावना दृढ झाली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी महिलांचे विविध प्रश्न, त्यांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. सौ. एन. डी. काशिद पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख क्रीडा प्रशिक्षक प्रा. प्रशांत मोटे यांनी करून दिली. सूत्रसंचालन जिमखाना प्रमुख डॉ प्रशांत पाटील यांनी केले. आभार प्रा.सौ.सुरेखा मंडी यांनी मांनले. या कार्यक्रमास विद्यार्थीनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे (दादा) व मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या कार्यक्रमास प्रोत्साहन मिळाले
शहाजी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
|