बातम्या
रस्ता सुरक्षा बाबत स्वयंशिस्त महत्वाची पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे
By nisha patil - 1/13/2024 6:51:54 PM
Share This News:
रस्ता सुरक्षा बाबत स्वयंशिस्त महत्वाची पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे
नेहरू युवा केंद्र दिनकरराव शिंदे, समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, राष्ट्रीय युवा दिन व रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह आयोजित संवाद कार्यक्रम कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार मोरे यांनी रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून,त्यातील बहुतांश अपघात योग्य ती काळजी न घेतल्यामुळे,जसे की हेल्मेट न वापरणे, नियंत्रित वेगापेक्षा गाडी जोरात चालविणे,सीट बेल्ट न वापरणे ,अपघातामध्ये विशेष करून तरुण वर्ग प्रभावित होत असल्यामुळे त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे हे क्रमप्राप्त असल्याचे नमूद करून उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांच्या चिन्हांची व ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये वापरात येणाऱ्या ब्रीथ अनालायझर मशीनची प्रात्यक्षिके दाखवली.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.महेंद्र जनवाडे यांनी केले.याप्रसंगी नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक श्रीमती पूजा सैनी यांनी नेहरू युवा केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर डॉ. टी. व्ही.जी.सर्मा व समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दीपक भोसले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी किर्लोस्कर कंपनीचे सेफ्टी मॅनेजर श्री. गोपाळ पडळकर तसेच सीएसआर ऑफिसर श्री. शरद आजगेेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सहाय्यक कामगार आयुक्त श्री.विशाल घोडके यांनी सुरक्षा हा विषय व्यापक असून तो सर्वच क्षेत्रात पाळला जाणे अपेक्षित आहे.विशेष करून विविध उद्योगधंद्यांमध्ये यंत्रसामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो व या ठिकाणी देखील अपघाताचे प्रमाण लक्षणीय असून यामुळे बऱ्याच जणांना प्राणास मुकावे लागते त्यामुळे सुरक्षितेबाबत व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन केले.याप्रसंगी रस्ता सुरक्षा विषयावरील घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या कु.अंजली वड्ड,कु. श्रावणी काळे व कु. वैष्णवी जगताप यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नेहा सूर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमास डॉ.सोनिया रजपूत, डॉ. सुरेश आपटे,डॉ. कालिंदी रानभरे, डॉ.दुर्गेश वळवी, प्रा.शर्वरी काटकर तसेच नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक श्री.नितीन भोसले , श्री.अमित हुजरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कु
पूर्वा सावंत,कु. मोहन तायडे,कु.रितेश कांबळे, कु. राधिका बुरांडे,कु. वैभव चव्हाण,कु
साहिल शिकलगार इत्यादींनी परिश्रम घेतले.
रस्ता सुरक्षा बाबत स्वयंशिस्त महत्वाची पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे
|