बातम्या

संजय मंडलिक यांच्या विजयासाठी धनुष्यबाण चिन्ह घर टू घर पोहचवा : राजेश क्षीरसागर

Send bow and arrow sign door to door for Sanjay Mandlik s victory Rajesh Kshirsagar


By nisha patil - 2/5/2024 5:28:39 PM
Share This News:



कोल्हापूर  : प्रतिनिधी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घर टू घर धनुष्यबाण चिन्ह पोहोचवा. फक्त विकासकामांवर बोला. पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मंडलिक यांना निवडून आणू या. दुसऱ्या कोणत्याही विषयावर भाष्य करू नका.

कोणतीही अडचण आली तर मला फोन करा. मी, २४ तास उपलब्ध आहे." असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. "खिम्याचा कट, धनुष्यबाणावर बोट" या संकल्पनेला अनुसरून ही बैठक झाली. या बैठकीत बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक, धैर्यशील माने हे निवडून येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भरभरून निधी मिळाला.

विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. शहर व जिल्ह्यातील विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी जनता राहिले ही खात्री आहे.निवडणुकीचे चित्र महायुतीच्या बाजूने आहे. कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण चिन्ह घरोघरी पोहोच करा.प्रचाराचे आणखी तीन दिवस आहेत. जोमाने काम करा.निवडणुकीत घर टू घर हा प्रचार प्रभावी ठरतो." शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपचे महानगराध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, शिवसेनेचे  महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, मा. परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, रुपाराणी निकम, माधुरी नकाते, भाजप महिला आघाडीच्या गायत्री राऊत, दिपाली मोकाशी यांची भाषणे झाली. किशोर घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राजू हुंबे, अजित मोरे, अमोल माने, प्रदीप उलपे, सुनील पाटील, विजय खाडे, प्रकाश गवंडी, हेमंत  आराध्ये, संगिता खाडे, मंगलताई साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, गणेश देसाई, विशाल शिराळकर, किरण गवळी, शिवसेनेचे उदय भोसले, रमेश खाडे आदी उपस्थित होते.


संजय मंडलिक यांच्या विजयासाठी धनुष्यबाण चिन्ह घर टू घर पोहचवा : राजेश क्षीरसागर