बातम्या

महेश सेवा समितीतर्फे ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार

Senior citizens felicitated by Mahesh Seva Samiti


By nisha patil - 9/14/2023 5:43:39 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  येथील महेश सेवा समितीच्या वतीने सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प. पू.श्री श्री 1008 जगदगुरु रामानुजाचार्य स्वामी श्रीधराचार्य महाराज यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
       

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष नंदकिशोर भुतडा यांनी केले.
 सदर प्रसंगी श्री श्रीधराचार्य महाराज यांनी महेश सेवा समितीच्या कार्याचा गौरव करून माहेश्वरी समाजाने समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करून पुण्य काम केले आहे.तसेच ज्येष्ठ नागरिकांना पुढील जीवनात वाटचाल कशी करावी आणि आपले आयुष्य आनंदी कसे जगावे , याचे मौलिक मार्गदर्शन केले.

 

यावेळी खा.धनंजय महाडिक यांनी माहेश्वरी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात तसेच गावात कुठलेही संकटसमयी हा समाज अग्रणी असतो. माहेश्वरी समाज व्यवसायाबरोबरच गावाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे,असे गौरोद्गार काढले.सदर प्रसंगी समाजातील 200 ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भगवद्गीता ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे आभार सचिव राधामोहन छापरवाल यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सारडा व सौ. संगीता सारडा यांनी केले.या वेळी ट्रस्टी प्रमुख श्रीवल्लभ बांगड,जिल्हा अध्यक्ष नितीन धूत, तहसील अध्यक्ष रामगोपाल मालानी,उपाध्यक्ष कमलेश राठी,कोषाध्यक्ष राधेश्याम बंग,सहसचिव धनराज डाळ्या,महिला अध्यक्ष निलम भराडिया,नवयुवक अध्यक्ष शेखर बांगड आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास महेश सेवा समितीचे कार्यकारणी,ट्रस्टी मंडळ व सर्व पदाधिकारी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महेश सेवा समितीतर्फे ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार