बातम्या
जिल्हा परिषदेत अनुकंपा नियुक्तीची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध, हरकती 3 फेब्रुवारीपर्यंत करू शकता
By nisha patil - 1/28/2025 7:14:13 PM
Share This News:
जिल्हा परिषदेत अनुकंपा नियुक्तीची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध, हरकती 3 फेब्रुवारीपर्यंत करू शकता
कोल्हापूर, जिल्हा परिषदेत गट क आणि गट ड मधील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा योजनेतून नोकरी मिळविण्यासाठी केलेल्या अर्जांची सन 2024 अखेरची संभाव्य ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेकडून तयार केली आहे. यामध्ये एकूण 66 उमेदवारांची नावे समाविष्ट असून त्यापैकी 13 प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. सध्या 53 उमेदवारांच्या अर्जांची प्रक्रिया प्रलंबित आहे.
ही यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर (www.zpkolhapur.gov.in) 28 जानेवारी 2025 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांना यादीवर हरकती, दुरुस्ती करण्याची संधी 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत दिली आहे. यासाठी उमेदवारांनी सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे समक्ष उपस्थित राहून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात.
जिल्हा परिषदेत अनुकंपा नियुक्तीची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध, हरकती 3 फेब्रुवारीपर्यंत करू शकता
|