बातम्या

निरामय जीवनासाठी ज्येष्ठांनीही करावा योगा

Seniors should also do yoga for a peaceful life


By nisha patil - 11/23/2023 7:15:50 AM
Share This News:



संपूर्ण आयुष्य कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी धडपड करण्यात घालवल्यानंतर वृद्धापकाळात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. याचे कारण म्हणजे तरूणपणी स्वताकडे बघण्यासाठी वेळच मिळत नाही. आयुष्याची संध्याकाळ आता जगायची, ह्या भावनेने पुढचा प्रवास सुरू असतो. मात्र, नेमका हाच मधला काळ कसा जगावा, हे आपल्या हातात राहत नाही. शरीराने साथ दिली तर ठीक नाही तर त्रास सोसावा लागतो. परंतु, योगा केल्यास जीवनाची संध्याकाळ खूपच उत्साह आणि आनंदाने जगता येऊ शकते.

ज्येष्ठ व्यक्ती आपल्या वयाचे कारण पुढे करत योगा करण्यास असमर्थता दर्शवतात. परंतु, हे चूकीचे आहे. युवा वृद्धो अतिवृद्धो वा व्याधितो दुर्बलोपिवा असा हठयोगात एकक आहे. याचा अर्थ तरुणांनी तर योग करावाच; परंतु वृद्ध-अतिवृद्ध म्हणजे अगदी ८५-९० वर्षे वयाचे सुद्धा योग करू शकतात. आजारी आणि दुर्बलही करू शकतात. यासाठी ज्येष्ठांनी नियमित योग केल्या ते निरामय आयुष्य जगू शकतात.
यम-नियमांच्या अभ्यासापासून योगाची सुरुवात होते. यम म्हणजे अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रीचर्य आणि अपरिग्रह तर नियम म्हणजे शौच संतोष, तप स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान होय. तिसरी पायरी आसनांची आहे. चौथी प्राणायामाची, पाचवी प्रत्याहार, सहावी धारणा, सातवी ध्यान आणि आठवी समाधीची आहे.

लंघनम्म परमऔषधीम असे म्हटले आहे. याचा अर्थ ऊठसूट उपवास करणे असा होत नाही. नैसर्गिक भूक लागते आणि त्यानुसार आहार घेणे हे ज्याला साधले व त्यासोबतच ज्याचे कर्माचरण चांगले असते, त्याला दु:खनाशन योग साध्य होतो. मधूनमधून लंघन जरूर करावे. उपवासाचे पदार्थ मनसोक्त खाणे यास लंघन म्हणत नाहीत. धौती बस्ती नेति, त्राटक नौलि कपालभाती या शुद्धी क्रियांचा प्रत्यक्ष प्रयोग शरीरशुद्धीसाठी महिन्या दोन महिन्यांतून जरूर करावा. शुद्ध सात्त्विक आणि पचेल असा हलका आहार घ्यावा. सत्त्वगुणांची वृद्धी करणाराच आहार घ्यावा. जेवणाच्या शेवटी ताक प्यावे. संध्याकाळी दूध प्यावे. सकाळी पाणी प्यावे, असे ग्रंथात सांगितले आहे.


निरामय जीवनासाठी ज्येष्ठांनीही करावा योगा