बातम्या

फसव्या वधूवर सुचक टोळीचा बंदोबस्त करा

Settle the suggestive gang on the cheating bride


By nisha patil - 12/15/2023 5:52:40 PM
Share This News:



फसव्या,तोतया, बोगस ,लुटारू वधू वर सूचक टोळीच्या कायमच्या बंदोबस्तासाठी मनसे आता आंदोलन करणार असून .मंगळवारी  २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी व  पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे.यामध्ये  फसगत झालेल्या वधू वरांच्या पालकांनी मनसेशी संपर्क साधावा असे आवाहन शहर संघटक सुनील सामंत यांनी आज पत्रकार बैठकीत केलय.

लग्न ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली‎य.आजमितीला लाखो तरुण लग्नाच्या‎ उंबरठ्यावर असून अनेकांची वय उलटून गेली‎त. मुलींची स्थळे दाखवतो म्हणून अनेक‎ बोगस वधू वर सूचक मंडळे, अनेक एजंट या‎ तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राजरोस‎पने  फसवत आहेत. 
फसवणूक होऊनही इज्जतीचा‎ पंचनामा नको म्हणून पीडित कुटुंबीय गप्प राहत‎ असल्याने या एजंटांचे प्रस्थ मात्र दिवसेंदिवस वाढत चाललय. सर्वत्र गावोगावी  हजारो तरुण अविवाहित‎ स्थितीत आहेत. पूर्वी मुलीला हुंडा द्यावा लागत‎ होता पण आता परिस्थिती बदललीय. फक्त‎ मुलगी द्या आम्ही सर्व करून घेतो, असे म्हणूनही‎ लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत. त्यातच‎ मुली आणि त्यांचे पालक यांच्या अपेक्षा‎ वाढल्याचेही दिसून येत आहे. याच भावनिक मानसिकतेचा गैरफायदा घेत ही तोतया, बोगस, लुटारू वधू वर सूचक टोळी सोकावली आहे...!! 

अशा फसव्या लुटारू टोळीच्या मुसक्या आवळल्या जाव्यात व अशा प्रकारांना कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मनसेने एल्गार पुकारला आहे.मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने मुलांना नवरी मुलगी मिळणं कठीण झालं आहे.. त्यात मुलांच्या तुलनेत मुलींचं उच्चशिक्षित असण्याचे प्रमाण वाढले असल्यानं त्यांना अपेक्षेत स्थळं उपलब्ध होत नसल्याने, गरजू विवाह इच्छुक मुलांच्या पालकांना हेरून, मुलींचे डमी फोटोज् आणि बायो डेटा तयार करून पैसे उकळण्याचा फंडा वापरला जात आहे.
वृत्तपत्रात तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून फसव्या जाहिराती देवून अनेकांची आर्थिक लुबाडणूक केली जातेय.यामुळं प्रामाणिकपणे वधू वर संस्था चालवणाऱ्या विनाकारण बदनाम होत आहेत.

या पार्श्वभूमीवर या विषयाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना पत्रव्यवहार करून अशा प्रकारच्या वधू वर सूचक मंडळावर बंदी घालावी.. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे.तरी फसवणूक झालेल्या वधू वर पालकांनी मनसेशी संपर्क साधावा असे आवाहन देखील मनसेच्या वतीन सुनील सामंत यांनी पत्रकार बैठकीत केलय.

यावेळी मनीषा घाटगे,दिशा मांडवकर,राहुल पाटील,महेश कदम,सचिन साळोखे उपस्थित होते.


फसव्या वधूवर सुचक टोळीचा बंदोबस्त करा