बातम्या

सेतू संस्थेच्या दिव्यांगांसाठी स्पर्धांचे यशस्वी आयोजन...

Setu Sansthas successful organization of competitions for the disabled


By nisha patil - 1/13/2025 7:52:53 PM
Share This News:



सेतू संस्थेच्या दिव्यांगांसाठी स्पर्धांचे यशस्वी आयोजन...

 सांगलीच्या मूकबधिर शाळेने पटकावली चॅम्पियनशिप

सेतू संस्था गेल्या 14 वर्षांपासून दिव्यांगांसाठी कार्यरत असून, या वर्षी विवेकानंद जयंती निमित्त शालेय कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी वाचा, चित्रवाचन आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 

सेतु संस्था गेली 14 वर्षापासून दिव्यांगांसाठी काम करते. यावेळी विवेकानंद जयंती निमित्त पश्चिम महाराष्ट्रातील 16 शाळांमधील 175 विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मा. सुहासराव हिरेमठ आणि पी.एच.डी. ॲपियर्ड दिव्यांग विद्यार्थी मा. ओंकार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

ओंकार पाटील यांनी पालकांना दिव्यांग मुलांसाठी योग्य मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर पारितोषिक वितरण समारंभ रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, सेंट्रलचे अध्यक्ष मा. संजय भगत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावर्षीची जनरल चॅम्पियनशिप सांगलीच्या जायंट्स क्लब मूकबधिर शाळेने जिंकली. या कार्यक्रमाला 250 पेक्षा जास्त जणांची उपस्थिती होती.


सेतू संस्थेच्या दिव्यांगांसाठी स्पर्धांचे यशस्वी आयोजन...
Total Views: 37