बातम्या

खसखसचा हलवा खाण्याचे सात फायदे

Seven Benefits of Eating Poppy Halwa


By nisha patil - 2/17/2024 7:33:35 AM
Share This News:



खसखसचे फायदे- खसखस ही आरोग्यासाठी चांगली असते. थंडीच्या दिवसात खसखसला सेवन केल्याने प्रोटीन, ओमेगा-6 फैटी एसिड, फाइबर, कॅल्शियम मिळते. खसखसमध्ये फाइटोकेमिकल्स, विटामिन बी, थायमिन, आणि मॅगनीज असते. खसखस ही रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी तिला बारीक करून मग दुधात टाकून सेवन करणे किंवा हलवा बनवणे. चला जाणून घेऊ या खसखसचा हलवा खाण्याचे फायदे. 

1. बद्धकोष्ठता दूर करते-
खसखस फायबरचे चांगले स्त्रोत आहे. खसखस सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. ही पाचन क्रियेला चांगल्या पद्धतीने संचालित करते. तसेच छोट्या छोट्या समस्या जसे की अधिक तहान लागणे, ताप, सूजने तसेच पोटात होणारी जळजळ यांपासून आराम मिळण्यासाठी खसखस उपयोगी असते. 
 
2. मेंदूला फ्रेश ठेवते-
खसखसचा हलवा तुमच्या मेंदूला फ्रेश ठेवतो. खसखसचा हलवा सर्व प्रकारच्या डोक्याच्या दुखण्यापासून आराम देतो. कारण यात ओमेगा-6 असते. खसखस मानसिक तणाव पासून मुक्ति देते... 

3. वेदना कमी करते- 
खसखस ही शारीरिक वेदना देखील कमी करते. कारण यात असलेले ओपियम एल्कलॉइड्स सर्व प्रकारचे दुखणे दूर करायला मदत करते. मांसपेशीमध्ये किंवा गुडग्याचे दुखणे पण खसखसने दूर होते.

4. त्वचेला तरूण ठेवते-
खसखसच्या सेवनाने चेहऱ्यावर चमक रहाते. खसखस सेवनाने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही. हे अँटीएजिंगचे काम करते. थंडीच्या दिवसात एक दिवस सोडून सेवन करणे. तसेच यात अँटीऑक्सीडेंट्स भरपूर मात्रामध्ये असते. जे तुम्हाला तरूण ठेवण्यात मदत करते. तसेच खसखस त्वचेतील ओलावा टिकून ठेवते. तसेच त्वचेवरील खाज आणि जळजळणे कमी करते तसेच एक्जिमा सारख्या समस्यांशी लढायला मदत करते. 
 
5. श्वास संबंधित समस्या दूर करते- 
खसखस सेवन केल्याने श्वास संबंधित आजार दूर होतात. तसेच खोकला देखील कमी करते खसखसच्या सेवनाने श्वास संबंधित समस्या पुन्हा पुन्हा निर्माण होत नाही. 
 
6. किडनीस्टोन- किडनीस्टोन दूर करण्यासाठी देखील खसखसचा उपयोग करू शकतो. यात असलेले 
ओक्सलेट्स शरीरात असलेले अतिरिक्त कॅल्शियमचे अवशोषण करून किडनी स्टोन होण्यापासून थांबवते. 
 
7. निद्रानाश- जर तुम्ही झोप येत नाही म्हणून चिंतित असाल तर झोपण्यापूर्वी खसखसचे दूध सेवन करणे किंवा  हलवा सेवन करणे. हे निद्रानाशची समस्या दूर करते व तुम्हाला झोपण्यासाठी प्रेरित करते.


खसखसचा हलवा खाण्याचे सात फायदे