बातम्या

सातबारा महागला

Seventeen is expensive


By nisha patil - 6/12/2023 4:37:53 PM
Share This News:



सातबारा महागला

पंधरा रुपयाचा सातबारा पंचवीस रुपयांना मिळणार

फेरफार साठी ही मोजावे लागणार 25 रुपये

सातबारा ऑनलाईन झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच नागरिकांना उपलब्ध होतो. याकरिता नागरिकांना प्रति सातबारा 15 रुपये शुल्क भरावे लागते. आता त्यात सरकारने वाढ केली आहे. यापुढे 15 रुपयांचा सातबारा 25 रुपयांना मिळणार आहे. पहिल्या दोन पानांसाठी ही रक्कम आकारली जाईल. त्यापुढील प्रत्येक पानाला दोन रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहेत.खरेदी-विक्रीची फेरफार वगळता वारस नोंद, बोजा नोंद, बोजा कमी, नाव कमी आदी आठ प्रकारच्या फेरफार नोंदवण्यास आता शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी फेरफार अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. आता सर्व फेरफार ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवावे लागणार आहेत. यामुळे ज्या फेरफार संबधितांना सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र आदींद्वारे कराव्या लागतील, त्या ठिकाणी प्रत्येक फेरफार अर्जासाठी 25 रुपये मोजावे लागणार आहेत.

 


सातबारा महागला