बातम्या
सांडपाणी प्रक्रिया केंद्र रंकाळ्यावर उभारणार
By nisha patil - 1/15/2025 4:08:09 PM
Share This News:
सांडपाणी प्रक्रिया केंद्र रंकाळ्यावर उभारणार
महापालिकेच्या राज्य सरकारच्या अमृत-२ योजनेतून प्रस्ताव
कोल्हापूरातील रंकाळा तलावात सांडपाणी मिसळून तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासन श्याम हौसिंग सोसायटी नाल्यावर बंधारा घालून सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्य सरकारच्या अमृत-२ योजनेतून मंजूर करून घेण्यात येईल, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी श्याम हौसिंग सोसायटी येथील नाल्यावर जावुन प्रदूषणाची पाहणी केली.
कोल्हापूरातील रंकाळा तलावात सांडपाणी मिसळून होणारं तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासन श्याम हौसिंग सोसायटी नाल्यावर बंधारा घालून त्याठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्न सुरु आहे. असा प्रस्ताव करून राज्य सरकारच्या अमृत-२ योजनेतून मंजूर करून घेण्यात येणार आहे, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी श्याम हौसिंग सोसायटी येथील नाल्यावर जावुन प्रदूषणाची पाहणी केली. हा प्रस्ताव मंजूर झाला आणि तत्काळ निधी उपलब्ध झाला तर तलावातील पाण्याच्या प्रदूषणाचा कायमचा प्रश्न मिटेल. श्याम सोसायटी येथील नाल्यातील बहुतांश वेळा बंधारा ओसंडून वाहत असतो, तेव्हा मैलामिश्रित सांडपाणी थेट तलावात मिसळते. ते रोखण्यासाठी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. त्यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
सांडपाणी प्रक्रिया केंद्र रंकाळ्यावर उभारणार
|