बातम्या
शहाजी महाविद्यालयात शाडूमुर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 8/29/2023 1:27:31 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात शाडूमुर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शाडू मुर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी झाडांची पाने व फुलांपासून रंग बनवणे याविषयी माहिती दिली, सुरज कुंभार यांनी शाडूंच्या मुर्त्या बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के. शानेदिवाण होते. कार्यक्रमास नॅक समन्वयक डॉ. आर.डी. मांडणीकर, प्रा. डॉ. डी. के. वळवी, प्रबंधक मनीष भोसले, प्राध्यापक डॉ. डी. एल. काशीद - पाटील पर्यावरण अभ्यास विभागाच्या प्राध्यापक दीपा पाटील आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. के. एम. माळी यांनी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कु. फातिमा सय्यद हिने केले. प्रा. एस. एच. चरापले यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे व मानद सचिव श्रीमती संगीता बोंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
शहाजी महाविद्यालयात शाडूमुर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न
|