बातम्या

शाहरुख खानचा अमेरिकेत अपघात; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया

Shah Rukh Khans accident in America Surgery by a doctor


By nisha patil - 4/7/2023 8:39:52 PM
Share This News:



शाहरुख खानचा अमेरिकेत अपघात; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया

तारा न्यूज वेब टीम  अभिनेता शाहरुख खान हा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये  शूटिंगसाठी गेला होता, तिथे त्याचा अपघात झाला आहे. या अपघातात शाहरुखच्या नाकाला दुखापत झाली. अपघातानंतर शाहरुखच्या नाकाची शस्त्रक्रियाही करावी लागली. शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर रक्तस्त्राव थांबण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. शाहरुख खान लॉस एंजेलिसमध्ये एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होता, तिथे त्याला नाकाला दुखापत झाली. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला, त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी शाहरुखच्या टीमला सांगितले की, काळजी करण्यासारखे काही नाही. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल. शाहरुख आता भारतात परतला असून तो या दुखापतीतून सावरत आहे, असं म्हटलं जात आहे.  शाहरुखच्या टीमकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


शाहरुख खानचा अमेरिकेत अपघात; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया