बातम्या

शाहरुख खानचा नवा लूक व्यायरल

Shah Rukh Khans new look goes viral


By nisha patil - 3/6/2024 6:21:30 PM
Share This News:



देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी  आणि राधिका मर्चेंट यांचा दुसरा प्री-वेडिंग कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. या खास कार्यक्रमानिमित्त विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. चार दिवस चालणारं हे दुसरं प्री-वेडिंग खूपच खास होतं. क्रूज पार्टीतील सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, कियारा आडवाणी, शनाया कपूर आदि सेलिब्रिटींचे फोटो समोर आले आहेत. अशातच शाहरुख खानचा  एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये किंग खानचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे.
 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये किंग खानचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. शाहरुख आपल्या 'पठाण' लूकमध्ये दिसून आला. व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खानचे लांबलचक केस आणि फ्रेंच बीयर्ड दिसून येत आहे. निळ्या आऊटफिटमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा स्टोल कॅरी केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खानसोबत रणबीर कपूरदेखील झळकला. या फोटोमध्ये रणबीर कपूर चॉकलेट बॉय म्हणून दिसत आहे.


शाहरुख खानचा नवा लूक व्यायरल