बातम्या

शहाजी महाविद्यालय राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न . खेळाडूंचा सत्कार, रसीखेच स्पर्धेचे आयोजन

Shahaji College celebrated National Sports Day with enthusiasm


By nisha patil - 8/29/2023 7:55:52 PM
Share This News:



 कोल्हापूर: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज राष्ट्रीय क्रीडा दिन  उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने  आयकर विभागातील अधिकारी व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेटलिफ्टर सौ.वर्षा पत्की पाटील  यांचे आरोग्य तंदुरुस्ती यावर व्याख्यान झाले. महाविद्यालयातील अनेक खेळाडूंचा सत्कार ही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. 
 

 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थित झाले. स्वागत व प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रशांत मोठे यांनी केले. आभार डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी मांडले.  प्रबंधक मनीष भोसले , भूगोल विभाग प्रमुख डॉ.डी.एल.काशीद पाटील, ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील, डॉ.नीता काशीद पाटील विजय लाड, खेळाडू यावेळी उपस्थित होते .यावेळी रसीखेच स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.


शहाजी महाविद्यालय राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न . खेळाडूंचा सत्कार, रसीखेच स्पर्धेचे आयोजन