बातम्या
श्रीपतराव बोंद्रे( दादा)व विजयराव बोंद्रे (बापू) जयंती महोत्सवास शहाजी महाविद्यालय विविध उपक्रमांद्वारे सुरुवात
By nisha patil - 12/18/2023 11:05:42 PM
Share This News:
कोल्हापूर: महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे (दादा) व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव कै. विजयराव बोंद्रे (बापू) यांच्या जयंती महोत्सवास आज शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रमांद्वारे सुरुवात झाली.
यानिमित्ताने आज विजयराव बोंद्रे (बापू) यांच्या जयंती दिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन, ग्रीन क्लब च्या वतीने पर्यावरण संदर्भातील पोस्टरचे प्रदर्शन, दादा - बापू विशेषंकाचे प्रकाशन झाले. संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांनी संस्था परिसरात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज, श्रीपतराव बोंद्रे दादा, छत्रपती शहाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विजयराव बोंद्रे बापू यांच्या 63 व्या जयंतीनिमित्त त्यांना आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण माजी प्राचार्य एकनाथ काटकर, साई हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय पाटील, श्री अजित पाटील यांनी दादांच्या व बापूंच्या जीवन,कार्याला उजाळा देणारी मनोगते व्यक्त केली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सूत्रसंचालन प्रा. पी. के. पाटील यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील यांनी केले. आभार डॉ .के.एम.देसाई यांनी मांनले.
राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अतुल पाटकर , वेणूताई चव्हाण मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेश कागले, श्री शाहू छत्रपती आयटीआयचे प्राचार्य श्री सुरेश वाघरे, श्रीपतराव बोंद्रे दादा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य सौ. गौरी मोहिते मॅडम, जवाहर नगर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री युवराज पोवार ,संस्थेचे संचालक राजेंद्र जाधव, अधिक्षक रुपेश खांडेकर, विठ्ठल आंबले, महाविद्यालयाचे अधिक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी व दादा- बापूंच्यावर प्रेम करणारे सहकारी यावेळी उपस्थित होते .
ग्रीन क्लब च्या वतीने झालेल्या पोस्टर प्रदर्शनात विविध विभागातील 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या पोस्टर प्रदर्शनाद्वारे त्यांनी पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. ग्रीन क्लब चे प्रमुख डॉ.शिवाजी जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले . विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव चे डॉ.सूर्यकांत मस्के यांनी परीक्षण केले, डॉ.सयाजी गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
श्रीपतराव बोंद्रे( दादा)व विजयराव बोंद्रे (बापू) जयंती महोत्सवास शहाजी महाविद्यालय विविध उपक्रमांद्वारे सुरुवात
|