बातम्या

शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयास सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

Shahaji College won Shivaji University


By nisha patil - 1/27/2024 7:23:54 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयास सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

शाहूपुरी जिमखाना मैदान येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेत दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने दमदार कामगिरी करीत सलग दुसऱ्या वर्षी वेणूताई  चव्हाण चषकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात महावीर महाविद्यालयावर आठ गाडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात के. डब्ल्यू. सी. कॉलेज सांगली यांच्यावर दहा गडी राखून  विजेतेपदासह अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार सौम्यलता बिराजदार, सानिका लाड, प्रज्ञा कांबळे, स्नेहा साळे व अंकिता गायकवाड यांनी बहारदार कामगिरी केली. 
   

विजेता संघास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. मानसिंग बोंद्रे दादा, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, जिमखाना प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, प्रा. प्रशांत मोटे व प्रशिक्षक प्रा. सरदार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयास सलग दुसऱ्यांदा विजेतेपद