बातम्या
शहाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर बहिरेश्वर संपन्न.
By nisha patil - 1/24/2024 7:42:59 PM
Share This News:
कोल्हापूर: शहाजी महाविद्यालयाच्या एनएसएसचे शिबिर बहिरेश्वर येथे मंगळवार दि १६/०१/२०२४ ते सोमवार दि २२/०१/२०२४ या कालावधीत संपन्न झाले
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार श्री पी. एन. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे काम ग्रामविकासाठी दिशादर्शक असून महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला या संकल्पनेशी हे सुसंगत आहे. प्रत्येकाने किमान दोन झाडे लावून ती जगवावीत असे आवाहन याप्रसंगी केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे (दादा) यांचे मौलिक मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली.
बहिरेश्वरच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना निवृत्ती दिंडे- पाटील, गोकुळचे संचालक श्री बाळासाहेब खाडे, जि.प. माजी सदस्य सुभाष सातपुते,सिताराम पांडुरंग पाटील (बापू ) रघुनाथराव बाबुराव वरुटे (मामा), सूर्यकांत सदाशिव दिंडे पाटील (बापू) जयवंत हावालदार, पंढरी कृष्णा काशिद (गुरुजी) उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
जलसाक्षरता, महिला सबलीकरण, ग्राम स्वच्छता, वृक्ष संवर्धन, अंधश्रद्धा निमूर्लन , आरोग्य शिबिर, पर्यावरण जनजागृती, मराठी भाषा संवर्धन, व्यसनमुक्त भारत हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमाची नियोजन करण्यात आले.
या शिबिरातील प्रस्तावित कार्याची पूर्तता होण्यासाठी काही प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राध्यापक संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना एनएसएस स्फूर्ती गीते म्हणून दाखवली. स्फूर्ती गीते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक चैतन्यमय स्फूर्ती जागृत करतात. म्हणून विद्यार्थ्याना राष्ट्रीय सेवा योजनेची स्फूर्ती गीते पाठ असायला हवीत असे मत प्राध्यापक संदीप शिंदे पाटील (कोल्हापूर शहर एनएसएस समन्वयक) यांनी व्यक्त केले.
गावातील युवकांच्या मागणीनुसार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याची गरज ओळखून कोल्हापूर विभागाचे सिंघम म्हणून ज्यांची प्रतिमा आज सर्वज्ञात आहे असे माननीय श्री सरदार नाळे साहेब (डी वाय एस पी ) लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय कोल्हापूर यांना आमंत्रित केले होते. यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स युवकांना दिल्या. स्वःता बारावी नापास असून सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात स्पर्धापरीक्षेत सर्वाधिक मार्कस् मिळवण्याचा सन्मान मिळवला. अनेक यशस्वी शिखरे गाठण्यासाठी परिश्रम हाच महत्त्वाची बाब असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. अभ्यासाचे वेड लागल्याशिवाय यश संपादन करता येत नाही.आपल्या आयुष्यात झालेला अपमान विचारात घेऊन सन्मान मिळवण्याची ती संधी असते अशी महत्त्वाची भूमिका मांडली. त्यांना मानधन म्हणून दिलेल्या एक हजार रुपयांमध्ये स्वतःचं चार हजार रुपये ऍड करून आमच्या गावातील स्पर्धा परीक्षा केंद्राला पाच हजार रुपयाची मदत केली.या आदर्श कृतीचं गावामध्ये कौतुक होत आहे .
गावामध्ये शाश्वत पर्यावरणाचा विचार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने शहाजी महाविद्यालयातील शाश्वत पर्यावरणावर आधारित निवडक पोस्टर प्रदर्शन मांडण्यात आले.
आदर्श गाव एक अनुभव माननीय दिलीप पाटील (बिनविरोध सरपंच गोलीवडे, तालुका पन्हाळा) यांनी गाव आदर्श बनवण्यासाठी गावातील सर्व स्तरातील लोकांनी स्वनिधीतून गाव विकासाची सुरुवात केल्यास शासनाकडून कोट्यावधी रुपयाची मदत चालून येते हा त्यांचा अनुभव ग्रामस्थांसमोर मांडला. ग्राम व्यवस्थामध्ये प्रामाणिकता, पारदर्शकता जाणीवपूर्वक आणल्यास गाव स्वच्छ आणि सुंदर होण्यास फार दिवस लागत नाहीत. ग्रामविकासात पारदर्शकता हेच सर्वात महत्त्वाचं गमक आहे असे मत त्यांनी व्यक्त केलं. गावातील युवकांचा गाव विकासासाठी निधी मिळवण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग करून घेण्यात आला याबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केली.
राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर बोलत असताना प्रा पवनकुमार पाटील यांनी युवकांच्या हृदयाला स्पर्श केला. तरुण वयामध्ये स्वामी विवेकानंद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता देशाचा विचार केला अशा समाजसुधारकांची म्हणून आपण दररोज पूजा केली पाहिजे. जगात तरुण शक्तीचा वापर देशाच्या विधायक कार्यासाठी करून घेतला पाहिजे. सोशल मेडिया आणि मोबाईलच्या मायाजाळमध्ये तरुणांची प्रचंड मोठी शक्ती अडकून वाया जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जपान सारख्या देशातील युवकांची सामर्थ्य आणि समर्पण भावनेचे दाखले देऊन गावातील युवकांच्या मनामध्ये राष्ट्र प्रेमाची ज्योत निर्माण करण्याची प्रयत्न प्राध्यापक पाटील सरांनी केली.
महिला सबलीकरण याविषयी बोलताना सौ राणी बाळासाहेब पाटील माननीय माजी सरपंच भुयेवाडी,राज्य अध्यक्ष महिला आघाडी सरपंच परिषद मुंबई . यांनी सुरुवातीच्या काळापासूनच महिला सबला होत्या परंतु त्यांना सबल असल्याची जाणीव करून देण्याची गरज भासत असल्याची खंत व्यक्त .आजच्या महिला चूल मूल या जीवन प्रवासाच्या सुरुवातीपासून शिक्षण, संशोधन, राजकारण, समाजकारण, डॉक्टर, इंजिनीअर, सरपंच, वैमानिक क्षेत्र, विज्ञान क्षेत्र, अंतराळ क्षेत्र आणि देशाच्या राष्ट्रपती पर्यंतच्या सर्व क्षेत्रात सध्या महिला सक्षमपणे भूमिका सांभाळत आहेत.
भूपाळी ते भैरवी आजही मानवी मनाला आत्मशांती आणि मनसमृद्ध करणारी पहाटेच्या वेळची भूपाळी, भावगीत, भक्ती गीतं, पोवाडा, लग्न आष्टका, वासुदेवाचे गाणे, झिम्मा फुगडीची गाणी, प्रवचन, किर्तन, लावणी, कलगी तुरा,असे बहुविध सामर्थ्य मराठी भाषेमध्ये . मराठी भाषेचं संवर्धन करणे आज काळाची गरज बनली असल्याची मत मा. विजय जाधव यांनी मांडले.
आजचा युवक आणि ग्रामविकास या विषयावर प्राध्यापक मधुकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. आज युवकांचे ग्रामविकासामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. युवाशक्ती ही प्रचंड मोठी शक्ती असून त्यांनी ग्रामविकासात प्रत्यक्ष सहभाग आणि सकारात्मक भूमिका घेतली तर गांधीजींच्या स्वप्नातला सुंदर खेड्यांचा देश जगात भारत देशच बनू शकतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ऐसे कैसे झाले भोंदू :अंधश्रद्धा निर्मूलनाची विनोदी बतावणी ही एकांकी श्री कृष्णा स्वाती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केली. अलीकडच्या काळात आधुनिक आणि शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल झाला असला तरी काही गावागावांमध्ये अंधश्रद्धा अजूनही जटील बनली आहे. जादूटोणा चमत्कार यांना लोक बळी पडतात आणि आयुष्य उध्वस्त करून घेतात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जनजागृतीसाठी जादूटोणा आणि चमत्काराची प्रात्यक्षिक दाखवून सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न या टीमने केला.पैशाचा पाऊस, हातातून सोन्याची चैन काढणे, जिभेतून आरपार लोखंडी सळी घुसविणे, डोळ्याला पट्टी बांधून वस्तूंचा शोध घेणे असे विश्वास बसणार नाही असे चमत्कार करून दाखवले आणि प्रत्येक इवेंटच्या मागे शास्त्र असल्याचे त्यांच्या टीमने सर्वांसमोर सादर करून दाखविले. लोकांनी प्रचंड प्रतिसाद मिळाला.
ग्राम स्वच्छतेमध्ये गावातील सर्व गल्ल्यांची स्वच्छता करण्यात आली गटारे साफ करण्यात आली गावातील कोटेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मंदिर गुरु मंदिर इत्यादी पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आली झाडाझुडपाच्या विळख्यात अडकलेली पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करण्यात आले जनजागृतीची रॅली काढण्यात आली
ग्राम सर्व्हेक्षण या शिबिराचे संयोजन डॉ.डी.एल.काशीद पाटील, डॉ. सौ. एन. डी.काशीद पाटील,डॉ.शिवाजीराव जाधव ,विजय लाड, अतुल कांबळे व इतर सहकाऱ्यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय सहकारी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. शानेदिवाण,संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या शिबिरास प्रोत्साहन मिळाले.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. टी. एम. चौगुले यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
शहाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर बहिरेश्वर संपन्न.
|