बातम्या

विवेकानंद  कॉलेजच्या  शहाना रेवणकर हिची  युरोप येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात  निवड

Shahana Revankar of Vivekananda College selected in Indian team for International Floor Ball Tournament to be held in Europe


By neeta - 5/2/2024 5:17:34 PM
Share This News:



 कोल्हापूर : कन्याकुमारी  येथे झालेल्या राष्ट्रीय प्लोअर स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेजची शहाना सुरेश रेवणकर (बी.सी.एस.भाग 2)  हिची महाराष्ट्र संघातून निवड झाली होती.  सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून कु. शहाना रेवणकर हिला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. या स्पर्धेमधून तिची  फिनलँड (युरोप) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये  निवड झाली आहे.

            या यशाबद्दल तिचे  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ईओ. श्री कौस्तुभ गावडे ,  विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले  व  शुभेच्छा दिल्या.  

 वरील खेळाडूस  ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा सहिदा कच्छी,  प्रा.हवलदार एन.आर.सणगर,प्रा संतोष कुंडले, प्रा समिर पठाण, बी.सी.एस. विभाग प्रमुख प्रा. पल्लवी देसाई, श्री सुरेश चरापले  यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


विवेकानंद  कॉलेजच्या  शहाना रेवणकर हिची  युरोप येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात  निवड