बातम्या

"शाहूच्या" पहिल्या पाच सल्फरलेस साखर पोत्यांचे विधिवत पूजन......

Shahus first five sulphurless sugar sacks duly worshiped


By nisha patil - 11/3/2024 7:23:22 PM
Share This News:



"शाहूच्या" पहिल्या पाच सल्फरलेस साखर पोत्यांचे विधिवत पूजन...... 
  
 ग्रामदैवत श्री.गैबीसह कागल मधील देव-देवतांना साखर पेढे अर्पण करून केला आनंदोउत्सव.... 

कागल/प्रतिनिधी  येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत  नवीन उत्पादित करण्यात आलेल्या पहिल्या पाच सल्फरलेस साखर पोत्यांचे पूजन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते विधिवत संपन्न झाले.
     

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा मंत्री व कारखान्याचे जेष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य, संचालिका, रेखा पाटील, सुजाता तोरस्कर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, , अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
         

 छत्रपती शाहू साखर कारखान्याने साखर उद्योगातील बदलती परिस्थिती व बाजारातील सल्फरलेस साखरेची मागणी विचारात घेऊन  मागील आठवड्यात कारखाना व्यवस्थापनाने सल्फरलेस साखर या  उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे. त्यानुषंगाने कारखान्याच्या वतीने या उपपदार्थ निर्मितीतून सल्फरलेस साखर निर्मितीच्या कामास प्रारंभ झाला आहे. या उपपदार्थ निर्मितीच्या मंगलमय प्रसंगाचे औचित्य साधून कागलचे ग्रामदैवत श्री.गैबी, कारखाना कार्यस्थळावरील श्री लक्ष्मी देवी तसेच कागल मधील देव-देवतांना साखर पेढे अर्पण करून सभासद, कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
 


"शाहूच्या" पहिल्या पाच सल्फरलेस साखर पोत्यांचे विधिवत पूजन......