बातम्या

कोलोलीच्या शिवशंभो दुध संंस्थेच्या चेअरमनपदी विजया जाधव

Shamburaje Chairman Vijaya jadhav


By nisha patil - 3/17/2024 11:07:13 PM
Share This News:



व्हा.चेअरमन पदी  संजय जाधव बिनविरोध निवड 

पांडुरंग फिरींगे  पन्हाळा : प्रतिनिधी कोलोली (ता. पन्हाळा) येथील शिवशंभो सहकारी दूध  व्यावसायिक संस्थेच्या चेअरमनपदी विजया यशवंत जाधव तर व्हा.चेअरमनपदी संजय जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी पोलिस पाटील मुरारी  पाटील यांच्या नेतृत्वाखालील गणेश पॅनलने बिनविरोध दोन जागेसह १० जागा जिंकत सत्ता कायम राखली.तर विरोधी पॅनेलच्या माजी सरपंच विश्वास चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील अॅड. दिगंबर जाधव संस्थापक पॅनलला केवळ एका जागेवर समाधान माणावे लागले होते.अँड दीपक पाटील यांनी योग्य नियोजन केले यामुळे विजय मिळवला.

आज निवडीवेळी संचालक मंडळासह पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अँड. दीपक मुरारी पाटील, विजया जाधव,  अशोक पाटील, विलास चौगुले, पांडुरंग पाटील, चंद्रकांत कांबळे, गीता कदम, सर्जेराव सुतार, मुरलीधर पोवार, प्रकाश चव्हाण आदी उपस्थितीत होते.निवडी नंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सभासदांच्या हिताचा कारभार करून सभासदांचा फायदा करण्यात येणार असल्याचे नुतन चेअरमन विजया जाधव यांनी तारा न्युज शी बोलताना सांगितले.


.चेअरमन पदी संजय जाधव बिनविरोध निवड