बातम्या

शंकर पाटील (दादा) समाजातील गरीबासाठी झटणारे नेतृत्व

Shankar Patil Dada A leader who strives for the poor in society


By nisha patil - 8/3/2024 6:34:32 PM
Share This News:



शंकर  पाटील (दादा) समाजातील गरीबासाठी झटणारे नेतृत्व

वाढदिवसाच्या निमित्ताने भेटायला आलेल्या सर्वांचा शतक्ष: आभारी आहे : शंकर पाटील


प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे कोल्हापूर :  शिवभक्त  पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष (अँन्टी करप्शन कमिटी) मा. शंकर पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवर यांनी उपस्थिती लावली होती.  वाढदिवसानिमित्त आज  विविध मान्यवरांनी निवासस्थानी भेट दिली  राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना शहराध्यक्ष  रवी इंगवले डॉ. आशोक बांदीवडेकर, आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निवासस्थानी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


 

 शंकर पाटील दादा यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठविला आहे. त्यांनी शिवकन्ट्रक्शन च्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक मध्ये उडी घेतली आहे. तसेच वैष्णवी रोडरोलर,गौरव इंजिनिअरिंग संस्था , आदी कार्यरत आहेत..कोल्हापूर शहराजवळ शिवमंदिर बांधकाम करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यामुळे शंकर पाटील दादा यांना अनेक गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.याकामी त्यांना पत्नी  सौभाग्यवती रूपा पाटील, चिरंजीव अँड केदार पाटील, वैष्णवी पाटील,गौरव पाटील सतत मदत मिळते. यामुळेच ते आपल्या कामात सध्या आघाडीवर आहेत. भविष्यात निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी तारा न्युज शी बोलताना सांगितले.


शंकर पाटील (दादा) समाजातील गरीबासाठी झटणारे नेतृत्व