राजकीय

राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर शरद पवारांचं पुन्हा मोठं विधान

Sharad Pawar's big statement again in front of NCP leaders


By nisha patil -
Share This News:



राष्ट्रवादी काँग्रेसचे  शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याची  घोषणा केल्यापासून राष्ट्रवादीत एकच खळबळ माजली आहे. काहीही झालं तरी शरद पवार यांनीच अध्यक्ष पदी कायम राहावं यावर कार्यकर्ते आणि नेते ठाम आहेत. त्यातच नव्या अध्यक्षाच्या नेमणुकीसीठी जी समिती नेमण्यात आली होती तिने पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एकमताने निर्णय घेतला. हाच निर्णय शरद पवार यांना सिल्व्हर ओकवर जाऊन कळविण्यातही आला. याचबाबत आता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. समितीने जो प्रस्ताव केला आहे त्याबाबत आता शरद पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली हे समोर आलं आहे. 
शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. एका कार्यकर्त्याने तर राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने त्याला वेळीच रोखण्यात आलं. असं असताना दुसरीकडे समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करून त्यांनी अध्यक्ष पदावर कायम राहावं असा प्रस्ताव पारित केला.हाच प्रस्ताव घेऊन समितीतील महत्त्वाचे नेते हे सिल्व्हर ओक म्हणजेच शरद पवारांच्या निवासस्थानी गेले होते. जिथे त्यांनी पवारांना प्रस्तावाबाबत माहिती दिली. त्यावेळी पवारांनी नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि यावर नेमका निर्णय घेण्यासाठी विचार करायला थोडा वेळ हवा असल्याचं समितीला कळवलं. म्हणजेच समितीने जरी पवारांना राजीनामा नामंजूर केला असला तरी शरद पवार हे राजीनामा मागे घेणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे पवार नेमका काय निर्णय घेणार याकडेच अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले आहेत.


राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर शरद पवारांचं पुन्हा मोठं विधान