बातम्या

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालं 'हे' नवीन नाव पांए फिरींगे

Sharad Pawar group gets new name from Election Commission  Feet firinge


By nisha patil - 7/2/2024 11:30:32 PM
Share This News:



शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालं 'हे' नवीन नाव  पांए फिरींगे  
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून नवं नाव देण्यात आलंय. शरद पवार गटाकडून आयोगाला दिलेल्या नावामधून एक नाव देण्यात आलंय. 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार'  असं निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला दिलेलं नाव आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरुपात शरद पवार गटाला हे नाव देण्यात आलंय. या निवडणुकीसाठी पक्ष चिन्हाची गरज नसल्यामुळं निवडणूक आयोगानं अद्याप चिन्हावर कुठलाही निर्णय दिलेला नाही. हे नवं नाव 27 फेब्रुवारीपर्यंतच वैध असणारय.


शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालं 'हे' नवीन नाव पांए फिरींगे