बातम्या
शरद पवार एकनाथ खडसे यांच्या भेटीला
By nisha patil - 6/11/2023 1:40:11 PM
Share This News:
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना काल हृदयविकाराचा झटका आलाय. त्यांना मुंबईत उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी काळजी घेण्याचं आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना काल हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काल रात्री उशीरा दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केलं. यावेळी खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे, एकनाथ खडसे यांच्यावर उपचार करणारे डॉ.अभिषेक ठाकुर हे इथे उपस्थित होते. डॉ. अभिषेक ठाकुर यांनी खडसेंच्या तब्येतीविषयीची माहिती शरद पवार यांना दिली.
एकनाथ खडसे यांना काल दुपारच्या सुमारास हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत दाखल करण्यात आलं. एकनाथ खडसे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने जळगावमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तर पुढील उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्समधून त्यांना मुंबईत आणण्यात आलं. यावेळी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, कन्या रोहिणी खडसे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक त्यांच्यासोबत होते.
शरद पवार एकनाथ खडसे यांच्या भेटीला
|