बातम्या

मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवारंच काय उत्तर..?

Sharad Pawar s answer to Maratha reservation question


By nisha patil - 10/26/2023 7:53:41 PM
Share This News:



मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले आहेत. सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबरपासून उपोषण सुरु केले. त्यानंतर राज्यात पुन्हा या  चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी त्यासंदर्भाच केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे गेल्याचे चर्चा रंगल्या होत्या. या सर्व प्रकरणात गुरुवारी शरद पवार यांनी यावर प्रतिक्रीया दिली
     
बारामतीमध्ये 18 आणि 19 जानेवारी 2024 ला कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनासंदर्भात गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली.  त्यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, साखरेचे प्रमाण वाढेल कसे? यासंदर्भात प्रदर्शनातून माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट   भूमिका महत्वाची ठरणार आहे. आजच्या बैठकीत याविषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीत जे प्रेझेंटेशन दिले ते ऊस शेतीसाठी महत्वपूर्ण असणार आहे. 
   

यावेळी मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, त्या विषयांवर आता मला काही बोलायचं नाही.त्यांच्या या उत्तराने मराठा आरक्षण विषयी शरद पवार हाथ झाडत असल्याचं दिसून आलं.


मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवारंच काय उत्तर..?