बातम्या

शरद पवारांचा वाढदिवस 'मामाच्या गावात' साजरा, कोल्हापूरातील गोलिवडेकरांनी दिल्या शुभेच्छा

Sharad Pawar s birthday


By nisha patil - 12/12/2023 11:10:00 PM
Share This News:



शरद पवारांचा वाढदिवस 'मामाच्या गावात' साजरा, कोल्हापूरातील गोलिवडेकरांनी दिल्या शुभेच्छा

कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा आज 83 वा वाढदिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, शरद पवारांचे आजोळ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोलिवडे या मामाच्या गावात ही  वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आलाय.

कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे हे शरद पवारांच्या मामाच गाव, जेव्हा कधी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असतात तेव्हा ते आवर्जून आपल्या आजोळी भेट देतात. गावातील
 श्री योगी प्रभुनाथ महाराज फौंडेशन आणि ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक महादेव कोंढरे यांच्या हस्ते या आजूळकरांनी केक कापून शरद पवारांचा वाढदिवस आज साजरा केला. यावेळी शरद पवारांना शतःयुष लाभूदें अशी गावकऱ्यांनी ग्रामदैवत भैरवनाथा चरणी प्रार्थना देखील केली.


शरद पवारांचा वाढदिवस 'मामाच्या गावात' साजरा, कोल्हापूरातील गोलिवडेकरांनी दिल्या शुभेच्छा