बातम्या

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शरद पवार कापसेवाडीत जाणार

Sharad Pawar will go to Kapsevadi to know the farmers woes


By nisha patil - 3/11/2023 8:26:15 PM
Share This News:



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिवाळी झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. शरद पवार हे 16 नोव्हेंबरला माढा  लोकसभा मतदारसंघातील कापसेवाडीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सोलापूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सध्या या तिन्ही जिल्ह्यात बेदाणा, दूध आणि टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या संदर्भात शरद पवार हे कापसेवाडीत शेतकरी मेळावा घेणार आहेत.

द्राक्षाचे भाव गडगडल्या मुळे त्यातुन सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बेदाणा तयार केला. त्यामुळे बेदाण्याचे दर कोसळले. सध्या वाढलेले टॉमेटोचे दरही कोसळले आहेत. दुध उत्पादकही दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार कापसेवाडीत येणार आहेत. दरम्यान, 23 ऑक्टोबरला देखील शरद पवार हे कापसेवाडीत येणार होते. मात्र, अचानक ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला होता.त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते.मात्र आता  येत्या 16 नोव्हेंबरला शरद पवार कापसेवाडीत येणार असल्याची माहिती कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे यांनी दिली.


शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शरद पवार कापसेवाडीत जाणार