बातम्या

शरद पवार 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर, दसरा चौकात होणार जाहीर सभा

Sharad Pawar will hold a public meeting at Dussehra Chowk on August 25 during his visit to Kolhapur


By nisha patil - 8/17/2023 6:54:11 PM
Share This News:



उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी फोडून महायुतीमध्ये गेल्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी बंडखोरांचा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर शरद पवार येत आहेत. या दौऱ्यात अजित पवार गटाच्या गळाल्या लागलेल्या हसन मुश्रीफांविरोधात रणशिंग फुंकणार का? याचीच  चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सावलीप्रमाणे शरद पवार यांना साथ दिलेल्या हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या जाळ्यात अडकल्याने राजकीय कूस बदलताना अजित पवारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद देण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांनी बंडखोरीनंतर छगन भुजबळांप्रमाणे कोणतीही जहाल वक्तव्ये केलेली नाहीत. त्यामुळे शरद पवार मुश्रीफांविरोधात थेट भूमिका घेणार की? अन्य पर्याय देणार? याची उत्सुकता आहे.  
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार कोल्हापुरात येत आहेत. दसरा चौकात त्यांची सायंकाळी चार वाजता जाहीर सभा होईल. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती असतील. या सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे शरद पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात येईल.


शरद पवार 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर, दसरा चौकात होणार जाहीर सभा