बातम्या

शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला म्हणाले..

Sharad Pawars Prime Minister Narendra Modi said


By nisha patil - 3/23/2024 5:45:41 PM
Share This News:



पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी बारामतीमध्ये शुक्रवारी शेतकरी आणि कामगार मेळाव्याला हजेरी लावली. यावेळेस उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी एकदा 'शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो' असं म्हणाले होते हा संदर्भ देत शरद पवारांनी निशाणा साधला आहे.

शरद पवारांनी आपल्या भाषणा मोदींनी शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आल्याचं म्हटल्याची आठवण करुन दिली. मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले असते तर आज ते ज्या पद्धतीने काम करत आहेत तसली कामं त्यांना करु दिली नसती, असं शरद पवार म्हणाले. ' मात्र आज त्यांचे (मोदींचे) जे काही राजकारण सुरू आहे. ते माझ्या विचारांनी नाही,' असं पवारांनी म्हटलं. तसेच पुढे बोलताना पवारांनी, 'माझं बोट धरल्यावर मी असलं काम करू देणार नाही,' असंही म्हटलं. "आज दुर्दैवाने देशामध्ये जे काही घडतंय ते वेगळं घडतंय. मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत. बारामतीला आले होते, तिथे भाषण केलं,  "शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो." पार्लमेंटमध्ये कधी भेटले तर अतिशय प्रेमाने बोलतात. हे बोलणं ठीक आहे पण करतात काय? धोरणं काय? कोणते निर्णय त्यांनी घेतले. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पध्दतीने वापरली जाते," अशी टीका शरद पवारांनी केली.


शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला म्हणाले..