बातम्या

बिल्किस बानो प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawars first reaction on the Bilkis Bano case


By nisha patil - 9/1/2024 1:30:39 PM
Share This News:



बिल्कीस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काल महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात गुजरात सरकारने 11 आरोपींची मुक्तता केली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बिवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारचा हा निर्णय रद्द केला. गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे धक्का दिला. शिक्षेत दिलेली सूट योग्य नाही. सन्मान हा महिलेचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलं.आज शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. “7 लोकांची हत्या आणि एक भगिनीवर अत्याचार याची सगळी पार्श्वभूमी गोध्राची आहे. गोध्रामध्ये जे काही घडल त्यानंतर ज्या  झाल्या होत्या. त्यापैकी ही घटना आहे” असं शरद पवार म्हणाले. “उशिर लागला. पण निदान सुप्रीम कोर्टाने जे गुन्हेगार सहभाही आहेत, त्यांच्याबद्दल सक्त भूमिका घेतली. आणि या प्रकरणात स्त्री वर्गाला, सामान्य माणसाला आधार देण्याच काम सुप्रीम कोर्टाच्या निकालाने झालं” असं शरद पवार म्हणाले.


बिल्किस बानो प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया