बातम्या

उदगिरी येथे शारदीय नवरात्र उत्सव आणि १२ कोटी ७२ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन

Sharadiya Navratri festival at Udgiri and ground breaking ceremony of development


By nisha patil - 10/10/2024 7:58:47 PM
Share This News:



उदगिरी (ता.शाहूवाडी) येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त काळम्मा देवीचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी मनोभावे दर्शन घेतले. तसेच उदगिरी येथे १२ कोटी ७२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले... 

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना करणे - ६० लाख,उदगिरी पैकी बौद्धवाडी येथे बौद्धविहार बांधणे - 35 लाख,उदगिरी पैकी बौद्धवाडी स्मशान शेड बांधणे - ४ लाख,उदगिरी गावठाण शंकर मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे - १० लाख,गुरववाडी दत्त मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे - १० लाख,उदगिरी येथे चावडी बांधणे - १२ लाख,उदगिरी पैकी केदार्लिंग वाडी येथे अंगणवाडी बांधणे - ११ लाख...

निळे-भेंडवडे-उदगिरी मुख्य रस्ता करणे - ४ कोटी २० लाख,खबरी तळे ते केदार्लिंग वाडी-उदगिरी गावठाण जोडणारा रस्ता करणे - ६ कोटी १० लाख,उभादेव फाटा ते काळम्मा देवी मंदिर रस्ता करणे  - १ कोटी रस्ता अशा विविध विकासकामांसाठी १२ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.या कामांचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले...

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती बबनराव पाटील(आप्पा),युवराज बाबा काटकर,विरळे गावचे माजी सरपंच कृष्णा पाटील,उदगिरी गावचे सरपंच शरद घोलप,उपसरपंच सुनिल पाटील,माजी सरपंच गणपती नारायण पाटील,राजाराम पाटील विजय पाटील राजाराम साबळे,रामजी कवडे,धोंडीबा कवडे,रमेश पाटील,अंकुश पाटील,अविनाश पाटील,नानू पाटील,बंडू पाटील...

शिवाजी पाटील,लक्ष्मण पाटील,नारायण पाटील,समिर पुजारी,संभाजी पाटील,सुरेश पाटील,आनंदा पाटील,आनंदा पाटील,दत्ता पाटील,रवी घोलप,सचिन घोलप,सखाराम घोलप,नथुराम चांदे,मारुती सावंत,मनाजी मुटल,विलास आगलावे,बबन पाटील,सुनिल पाटील,प्रदीप पाटील,राजु पाटील,नारायण खोत,यशवंत पाटील,विजय कवडे,सुभाष पाटील,मदन पाटील,पांडुरंग पाटील,केशव घोलप,मारुती लिंगडे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या...


उदगिरी येथे शारदीय नवरात्र उत्सव आणि १२ कोटी ७२ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन