बातम्या
तिने ३१ तासात पूल बांधून केला विक्रम...
By nisha patil - 5/8/2024 2:56:35 PM
Share This News:
केरळच्या वायनाडमध्ये पावसानं हाहाकार केला आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळं काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. गावं आणि गावकरी ढिगाऱ्याखाली आले आणि 200 हून अधिक मृत्यू झाले.वायनाडच्या दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सीता शेळके या महिला लष्करी अधिकारी आहेत. मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या मेजर सीता शेळकेंना सोशल मीडियावर मोठा सन्मान मिळताना दिसत आहेबचावकार्यातही अनेक अडचणी येत होत्या. याच अडचणींवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलामुळं एका लष्करी अधिकाऱ्यांची सध्या मोठी चर्चा होत आहे. या अधिकारी म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके.
चुराल्लमाला ते मुंदाक्काई या दोन गावांना जोडणारा पूल पावसानं वाहून गेला होता. त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचा लोखंडी पूल लष्करानं सीता शेळके यांच्या नेतृत्वात विक्रमी वेळेत तयार केला.सीता शेळके यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूझर त्यांचं 'वाघीण' म्हणत कौतुक करत आहेत.
तिने ३१ तासात पूल बांधून केला विक्रम...
|